Mumbai Crime : पाच वर्षाचे प्रेम, नंतर एक टोकाचा निर्णय अन् सगळं संपलं, घटनेने मुंबई हादरली…

Mumbai Crime : नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कळंबोली परिसरात १९ वर्षाची वैष्णवी बाबर आणि २४ वर्षाचा वैभव बुरुंगले यांची प्रेमकहाणी अंगावर काटा आणणारी आहे.

एक दिवस ही तरुणी आईला कॉलेजमध्ये जाते असे सांगून गेली आणि घरी आलीच नाही. यामुळे तिचा तपास सुरू झाला. नंतर या तरुणीचा मृतदेह खारघरच्या जंगलामध्ये पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता घटनेला वेगळे वळण लागले.

या तरुणीचे एका मुलासोबत पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र काही क्षुल्लक कारणांवरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर मुलीने हे रिलेशन नको, असा निर्णय घेतला. यामुळे त्यांच्यात खटके उडाले. यामुळे प्रियकराने रागाच्या भरात मुलीची गळा दाबून हत्या केली.

तसेच त्याने देखील एक चिठ्ठी लिहून स्वतः ट्रेन मधून उडी घेत आत्महत्या केली. मी वैष्णवीची हत्या केली आहे. मी स्वतःही आत्महत्या करत आहे. याला कोणालाही जबाबदार धरू नये असे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. पोलिसांनी मुलीचा शोध घेतला तर खारघरच्या जंगलामध्ये या मुलीची बॉडी आढळून आली.

दरम्यान, त्या दिवशी मुलीचा प्रियकर वैभव बुरुंगले याने जुईनगर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. दोघांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजने हे दोघे एकत्र असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला.

पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले. नंतर मुलीचा शोध सुरू झाला. या घटनेमुळे या कुटूंबांना एकच धक्का बसला आहे. त्यांचे प्रेमप्रकरण कोणालाही माहिती नव्हते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.