मुंबईला मिळाला नवीन पोलार्ड!! दिल्लीला धुणारा रोमॅरियो शेफर्ड आहे तरी कोण?

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठा सामना बघायक मिळाला. यामध्ये मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावा उभ्या केल्या. रोहित शर्माची आक्रमक सुरूवात अन् रोमॅरियो शेफर्ड याची वादळी फिनिशिंग यामुळे धावांचा मुंबईला डोंगर उभरता आला.

यामुळे या सामन्यात प्रेक्षकांना मोठी खेळी बघायला मिळाली. या सामन्यात ओव्हरमध्ये रोमॅरियो शेफर्डने मोठी खेळी केली. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली. यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईच्या पारडं जड झाले. रोमॅरियो शेफर्डने अखेरच्या ओव्हरमध्ये संपूर्ण कसर काढली.

रोमॅरियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेला 4 सिक्स अन् 2 फोर मारले. यामुळे अखेरच्या ओव्हरमध्ये 32 धावा मिळाल्या. यामुळे मुंबईचा स्कोर 234 झाला. रोमारियो शेफर्ड हा IPL मध्ये किमान 10 चेंडू खेळल्यानंतर सर्वाधिक बॅटिंग स्ट्राइक रेटने धावा करणारा फलंदाज बनला आहे.

यामुळे हा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला. तसेच तो आयपीएल सामन्यात शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. यामुळे येणाऱ्या काळात त्याला जास्तीक जास्त फलंदाजीसाठी उतरवले जाण्याचा प्रयत्न मुंबई करेल.

सनरायझर्स हैदराबादने शेफर्डला आयपीएल 2022 च्या लिलावात तब्बल 7.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. परंतु त्याला त्याच्या पदार्पणाच्या हंगामात फक्त तीनच सामने खेळता आले. पुढे लखनऊने रोमॅरियो शेफर्डला 50 लाखाच्या किमतीत खरेदी केले.

त्यानंतर आता यंदाच्या ट्रेड विन्डोमध्ये मुंबईने शेफर्डचे कर्तृत्व ओळखलं अन् नवा पोलार्ड तात्या संघात घेतला होता. यामुळे आता त्याची तुफान खेळी बघून आता तो पुढील सामन्यात वरच्या क्रमांकावर खेळायला उतरणार का? हे लवकरच समजेल.