Mumbai Mhada : म्हाडाच्या बिल्डींग अन् सेक्स रॅकेट..; मुंबई पोलिसांना समोर आणला मोठा कांड

Mumbai Mhada : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार येथील म्हाडाच्या एका वसाहतीमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नंतर नालासोपारा अनैकिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत एकावर अटकेची कारवाई केली.

या घटनेमुळे अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. यामध्ये दोन 23 वर्षीय बांगलादेशी मुलींसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. यंत्रणांना सुगावा लागताच एकाचा अटक करण्यात आली, तसेच दोघं फरार झाले आहेत. 

दरम्यान, विरार पश्चिमेला असणाऱ्या म्हाडाच्या एका मोठ्या वसाहतीत हा प्रकार सुरु होता. याबाबत कोणाला सुगावाही नव्हता. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. म्हाडा वसाहतीच्या डी – 7 इमारतीतील खेली क्रमांक 2104 मध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती.

आरोपी अशोक दास साथीदारांच्या मदतीने बांगलादेशातून बेकायदेशीररित्या अल्पवयीन मुलींची फसवणूक करून त्यांना देहव्यापारासाठी मुंबईत आणत होता, अशी माहिती यंत्रणेला मिळाली. यानंतर पोलिसांनी याठिकाणी जाऊन माहिती घेतली.

दरम्यान, विरारमधील याट फ्लॅटमध्ये तो या मुलींना ठेवून त्यानंतर ते त्यांना ग्रँट रोड परिसरातील रेड लाईट भागामध्ये पाठवत होता असेही तपासातून उघड झाले आहे. मात्र पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून एकाला ताब्यात घेतले आहे.

या आरोपींनी गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल 300 हून अधिक मुलींची फसवणूक करत त्यांना मुंबईत आणलं होतं, त्यांना जबरदस्ती या व्यवसायात आणले असल्याचे देखील सांगितले जात आहे.