Mumbai news : 40 वर्षांच्या मामीने 16 वर्षांचा भाच्यावर केले लैंगिक अत्याचार, धक्कादायक प्रकार आला समोर…

Mumbai news : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी १६ वर्षीय मुलाला मारहाण करून मामीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. मार्च महिन्यापासून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत ४० वर्षांच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. १६ वर्षांचा मुलगा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो मुंबईत मामाकडे राहण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. मामीने या १६ वर्षीय मुलाला मारहाण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

याबाबत आता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत १६ वर्षांचा मुलगा त्याच्या मामाकडे ताडदेव याठिकाणी रहायला आला होता. याठिकाणी मामीने त्याच्यावर अत्याचार केले.

तसेच मामी त्याला जेवण देत नव्हती. मारहाणसुद्धा करत होती. नंतर मुलाने हा सर्व प्रकार आईला सांगितला. यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यामुळे त्याच्या कुटूंबाला एकच संताप आला.

त्याच्या कुटुंबियांनी मुंबईत येत पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास ताडदेव पोलीस करत आहेत. दरम्यान, मामीने मुलावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केले. यामुळे मुलगा देखील घाबरला होता.

तसेच मामीने त्याला मारहाण करत गावी पाठवून देईन अशीही धमकी दिली. यामुळे हा मुलगा घाबरला होता. याबाबत त्याला घरच्यांनी देखील विचारपूस केली होती. यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.