Mumbai News : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराचा थरार बघायला मिळाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच तीन जण जखमी झाली आहेत. ही घटना घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर पोलीस लगेच याठिकाणी दाखल झाले.
पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. आझाद गल्ली, व्ही.एन. पूर्व मार्ग या ठिकाणी हा गोळीबार झाला. घटनेतील जखमींना सायन येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याबाबत अजून काही माहिती दिली नाही.
दरम्यान, गुंड पप्पू येरुणकर असं गोळीबार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पप्पू येरुणकर काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्याचा काही गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. यामुळे हा हल्ला झाला असल्याचे सांगितले जात आहे.
दुपारी साडे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी १६ राऊंड फायर केले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी याठिकाणी गर्दी झाली होती. सुमित येरुणकर हा तरुण आजच्या गोळीबारात ठार झाला असून तिघे जखमी आहेत.
जुन्या दुश्मनीतून हा गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या शोधासाठी नऊ पथके तयार करण्यात आलेली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.