Mumbai News : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडूनच लैंगिक अत्याचार, ६ वर्षांचं भयंकर सत्य आलं समोर…

Mumbai Crime News : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

धक्कादायक माहिती म्हणजे मागील सहा वर्षांपासून हा नराधम बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. मुलीच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. यावर मुलीने आक्षेप घेतला.

यावरुन संतापलेल्या बापाने तिला मारहाण केली. तिचे वडील 2017 पासून तिचा विनयभंग करत होते. मात्र भीतीपोटी तिने लैंगिक छळाची माहिती कोणालाही दिली नाही. मात्र सतत हा त्रास ती सहन करत होती.

आरोपीने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. मात्र त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. याला मुलीने नकार दिला. यामुळे त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या बापाने तिला मारहाण केली.

मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. यामुळे आईच्या जबर मानसिक धक्का बसला. मात्र आईने न घाबरला मुलीसह पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत बापाला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. कलम 354, 354A आणि 354B आणि POCSO कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. लवकरच पीडित मुलीचा जबाब नोंदवला जाणार आहे. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.