Mumbai News : मुंबई हादरली! घरभाड्यासाठी पत्नीला करायला लावले ‘ते’ कृत्य, घटनेने उडाली खळबळ…

Mumbai News : मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. स्वतःचे घर नसल्याने आणि भाड्याने घर घेण्याइतकी रक्कम नसल्याने त्याने हे कृत्य केले आहे.

धक्कादायक माहिती म्हणजे तिच्या पतीने व मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत महिलेच्या तक्रारीनुसार सांगली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, मारहाण यासारख्या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तरुणाला नोकरी नव्हती यामुळे त्याची आर्थिक स्थिती बेताची होती.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी त्याचे एका तरुणीशी लग्न झाले होते. त्याला दोन मुलीदेखील आहेत. घर भाड्याने घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यातच पत्नी दोन मुलींना घेऊन सांगलीमधून मुंबईत आली होती. यामुळे आता घर कस घ्यायचं असा प्रश्न निर्माण झाला होता.

दरम्यान, एका रात्री आरोपी पत्नीला घेऊन घाटकोपर येथील एका शाळेमागे तिला घेऊन गेला. तिथे तिला मित्रासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपी तिला एका मोकळ्या इमारतीत घेऊन गेला व तिथे दोन मित्रांसोबत नको ते करायला भाग पाडले.

पतीने तिचे तोंड बंद केले आणि हात बांधून ठेवले. नंतर त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही मित्र मला भाड्याचे घर घेऊन देणार आहेत, तुला पुढे देखील वेळोवेळी त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवावेच लागतील, असेही पतीने सांगितले. या सगळ्याला वैतागून तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.