मुंबई- पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात होणार!! देशातील पहिली हायपरलूप ट्रेन कधी पर्यंत धावणार? माहिती आली समोर

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने अनेक मोठे बदल केले आहेत. अनेक मोठ्या प्रमाणावर फास्ट रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आता सध्या देशात तसेच महाराष्ट्रात अनेक विकास कामे वेगाने पूर्ण होत आहेत. त्यातून गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे मुंबई-पुणे हायरलूप ट्रेनची.

ती कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ट्रेनमुळे मुंबई-पुणे हा प्रवास अवघ्या 25 मिनिटात पूर्ण होणार आहे. लवकरच या नव्या उपक्रमाला सुरूवात होईल. राज्य सरकारने हायरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमला मान्यता दिली आहे. यामुळे आता कामाला गती मिळणार आहे.

आता हा प्रकल्प लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये फार मोठा कायापालट होईल. मुंबई पुणे ही शहरे महत्वाची असून याठिकाणी अनेक प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे याबाबत मागणी वाढत आहे. त्यामुळे हे प्रकल्पही त्याअर्थी महत्त्वाचा ठरेल.

मुंबईहून पुण्याला विमानाने जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात. त्यामुळे ही ट्रेन विमानापेक्षाही जास्त फास्ट असणार आहे. मुंबई ते पुणे यातील अंतर हे सुमारे 148 किलोमीटर आहे. याठिकाणी लाखो प्रवासी याठिकाणी रोज ये जा करत असतात. या प्रकल्पामुळे प्रवाशांना चांगल्या आणि सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल.

यामुळे नवे रोजगारही तयार होणार आहेत. चुंबकीय तंत्रज्ञानाची ही ट्रेन पॉवडर बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने धावेल. ही ट्रेन व्हॅक्यूम ट्यूब सिस्टीममधून जाणाऱ्या कॅप्सूलसारख्या हायपरलूपमधून 1200 किमी प्रति तास वेगाने पळणार आहे. यामुळे प्रवास सुखर होणार आहे.

व्हर्जिन ग्रुपने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. याचे भाडे विमान प्रवासाच्या निम्मे असेल. मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, चेन्नई, चंढीगढ अशा ठिकाणी हे ट्रेन धावेल. ही ट्रेन 2032-33 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ही हायपरलूप ट्रेन बीकेसी म्हणजे वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सवरून धावेल आणि पुण्यातील वाकडपर्यंत जाईल. त्यामुळे ही ट्रेन कधी येईल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.