Nagpur news : पतंग पकडताना लहान भाऊ तलावात पडला, मोठ्यानेही उडी घेतली अन् घडलं भयंकर…

Nagpur News: नागपूरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी पतंग पकडताना दोन भाऊ कालव्यात बुडाले आहेत. यात लहान भावाचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या भावाला वाचवण्यात यश आले आहे.

घटनेची माहिती मिळताच याठिकाणी गर्दी झाली होती. पतंग पकडताना दोन भाऊ कालव्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत नागरिकांच्या सतकर्तने मोठा भाऊ थोडक्यात बचावला तर दुसरा बुडाला. यामुळे कुटूंबाने एकच हंबरडा फोडला.

ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे घडली. दोघेही महादुला परिसरात पतंग उडवित होते. त्यांची पतंग कापली. त्यामुळे ती कोराडी ऊर्जा प्रकल्पाजवळील कालव्यात पडली. यामुळे पतंग बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

तिला पकडण्यासाठी दयाशंकरने कालव्यात उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहाने तो वाहायला लागला. त्याला वाचविण्यासाठी कैलासनेही नदी उडी मारली. नागरिकांना तो दिसला. नागरिकांनी धाव घेत कैलासला बाहेर काढले. मात्र एकाला ते वाचवू शकले नाही.

लहान भाऊ वाहून गेल्याचे त्याने नागरिकांना सांगितले. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी देखील मुलाचा शोध घेतला.

दयाशंकर अवधेश प्रजापती (८), असे बुडालेल्या तर कैलास (१२), असे बचालेल्या मुलाचे नाव आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, एकाचा शोध घेण्यासाठी पट्टीचे पोहणारे जगदीश खरे आणि अनिल यांना बोलाविण्यात आले.

त्यांनाही तो आढळून आला नाही. रात्र झाल्याने शोध थांबविण्यात आला. आज पुन्हा त्याचा शोध घेण्यात येणार आहे. दयाशंकर हा तिसऱ्या वर्गात शिकत असून त्याचे वडील मडके आणि दिवे बनविण्याचे काम करतात.