नांदेडमध्ये राडा! आमदाराच्या गाडीवर संतप्त जमावाचा हल्ला, नेमकं घडलं काय? जाणून घ्या…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा जोरदार पेटला आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असताना मराठा समाज आता लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू लागले आहेत. अशातच नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे हे एका गावात कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेले असतांना त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली आहे. यामुळे राज्यातील परिस्थिती काहीशी बिघडत चालली आहे.

मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. याच मागणीसाठी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होती. राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली.

नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली आहे. आमदार मोहन हंबर्डे हे या भागात आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डे यांची कार फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित आहेत. यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे.

या गावात प्रवेश करताच मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत त्यांचा विरोध केला. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून मराठा समाज याबाबत आक्रमक झाला आहे.