Naresh Goyal : ‘यापेक्षा तुरुंगातच मेलो तर बरं होईल…’, बड्या भारतीय उद्योगपतीची ढसाढसा रडत कोर्टासमोर विनवणी

Naresh Goyal : एकेकाळी करोडोंचा मालक असलेले नरेश गोयल आज मरणाची भीक मागत आहेत. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी थरथरत्या हातांनी विनवणी करत न्यायालयासमोर आपले मत व्यक्त केले. त्यांनी सर्व आशा गमावल्या आहेत असे ते म्हणाले. ते कॅनरा बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याबद्दल तुरुंगात आहेत.

५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी मुंबई विशेष न्यायालयात हजर झालेले नरेश गोयल भावूक झाले आणि न्यायाधीशांसमोर रडू लागले. न्यायाधीशांसमोर हात जोडून ते म्हणाला की, मी आयुष्याची प्रत्येक आशा गमावली आहे. जगण्यापेक्षा तुरुंगातच मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिवाळखोर विमान कंपनी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात अडकले आहेत. या प्रकरणी ईडीने त्यांना १ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली होती. अटक झाल्यापासून तो मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करताना त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, त्यानंतर ते तुरुंगात आहे.

७० वर्षीय नरेश गोयल न्यायालयासमोर असहायपणे रडू लागले. ते म्हणाला की, त्यांना त्याच्या पत्नी खूप आठवण येते. त्यांची पत्नी कर्करोगाशी झुंज देत आहे. तिची काळजी त्यांची मुलगी घेते. पण त्यांची मुलगी देखील सतत आजारी असते.

नरेश गोयल यांनी सांगितले की, “तुरुंगात माझी तब्येत खराब आहे. मी खूप अशक्त झालो आहे आणि मला उभे राहणे देखील कठीण आहे. जेजेला रुग्णालयात पाठवून उपयोग नाही.” आर्थर रोड जेल ते जेजे हॉस्पिटल हा प्रवास त्यांच्यासाठी खूप वेदनादायी आहे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्याऐवजी जेलमध्येच मरण द्या, अशी मागणी त्यांनी न्यायाधीशांना केली.

न्यायालयाच्या सुनावणीच्या नोंदीनुसार, गोयल न्यायाधीशांसमोर हात जोडून बोलत होते, तेव्हा त्यांचे संपूर्ण शरीर थरथरत होते. सुनावणीसाठी बोलावू नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. नरेश गोयल यांची प्रकृती पाहता, त्यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे आश्वासन न्यायालयाने दिले.

दरम्यान, नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने १९९३ मध्ये जेट एअरवेजची स्थापना केली, परंतु 2019 मध्ये कर्ज न भरल्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये जेट एअरवेजची सेवा बंद करण्यात आली. फोर्ब्सच्या मते, २०१२ पर्यंत नरेश गोयल यांची संपत्ती १.९ अब्ज डाॅलर होती. ते भारतातील 16 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु एका चुकीने सर्व काही उद्ध्वस्त केले.