Nashik Doctor Attack : डॉक्टर राठींवरील हल्लाचे धक्कादायक कारण आलं समोर, सीसीटीव्हीत सगळंच झालं उघड…

Nashik Doctor Attack : नाशिकमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत पोलीस तपास सुरू होता. असे असताना आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोललं जात होतं.

असे असताना मात्र आता या हल्ल्याचे खरं कारण समोर आलं आहे. आरोपीने डॉक्टरवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. या हल्ल्याचे कारण डॉक्टर आणि कर्मचारी महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समोर येत आहे.

या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपीने कोयत्याने डॉ. कैलास राठी यांच्यावर जवळपास 18 वार केले आहेत. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहरात रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेत डॉक्टर राठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर कैलास राठी यांच्यावरील हल्ल्याचे धक्कादायक सीसीटीव्ही आता समोर आलं आहे. त्या आधारे पोलीस तपास करत आहेत. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत.

या सीसीटीव्हीमध्ये अज्ञात आरोपीने डॉक्टर राठी यांच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याचे समोर आलं आहे. सीसीटीव्ही पुढे आल्याने आता पोलिसांनी आरोपी कुठे पळाला याबाबत तपास करत आहेत. मात्र सध्या याबाबत आता अजून कोणाला ताब्यात घेतले नाही.

दरम्यान, या डॉक्टर आणि कर्मचारी महिलेचे अनैतिक संबंध असल्याची माहिती आधीपासून पुढे येत असल्याची माहिती आहे. याबाबत माहिती समोर आलेली असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेमुळे नाशिक शहर हादरले आहे.