Navi Mumbai Crime: नवी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील नेरूळ परिसरात पार्किंगच्या वादातून तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. नेरुळ परिसरात एकाच सेक्टरमध्ये मात्र वेगळ्या इमारतीमध्ये राहणारे विठ्ठल राक्षे आणि मंगेश साळगावकर यांच्यात हा वाद झाला.
यामधून हाणामारी देखील झाली आहे. याबाबत माहिती अशी की, विठ्ठल राक्षे काही कामानिमित्त मंगेश मुळगावकर यांच्या इमारती समोर गेले असता त्यांनी आपली गाडी मंगेश मुळगावकर यांच्या इमारतीच्या गेट समोर लावली होती.
दरम्यान, यावेळी मुळगावकर यांनी राक्षे यांना विचारणा केली असता दोघात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी मुळगावकर यांनी राक्षे यांना जबर मारहाण केली.
दरम्यान, मुळगावकर यांनी आपला पाळीव कुत्रा राक्षे यांच्या अंगावर सोडला. यामुळे हा कुत्रा त्यांना चावला असून ते जखमी झाले आहेत. याबाबत मंगेश मुळगावकर आणि त्यांचा मुलगा सौमिल मुळगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सध्या मोठ्या शहरांमध्ये कार पार्किंग सध्या वादाचा मुद्दा ठरत असल्याचे दिसत आहे. यामुळे वाद होतात.
वाढती वाहने आणि अपुऱ्या जागांमुळे कार पार्क कुठे करायची? असा प्रश्न अनेकदा पडतो. यावरुन भांडणे, वाद झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.