राष्ट्रवादीत सध्या दोन गट पडलेले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट हा शरद पवारांचा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती अजित पवारांकडे आमदारांचे संख्याबळ जास्त दिसत आहे. तसेच त्यांच्याकडे जाणाऱ्या नेत्यांची संख्याची वाढत आहे.
अशात काही नेते असेही आहेत, ज्यांनी अजून आपण कोणत्या गटात आहे हे स्पष्ट केलेले नाही. नुकतेच नवाब मलिक हे तुरुंगातून जामीनावर सुटले आहे. ते कोणत्या गटात जाणार याबाबतही चर्चा रंगली आहे.
२ महिन्यांसाठी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिकांना जामीन मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना तुरुंगात जावं लागलं होतं. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ते तुरुंगात गेले होते. ते तुरुंगात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे.
आता नवाब मलिक बाहेर आल्यानंतर ते कोणत्या गटात जाणार याची चर्चा रंगली आहे. नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. मलिक कोणत्या गटात जाणार याबाबत सुळेंना विचारण्यात आले असता मी इथे नेत्याला नाही तर मोठ्या भावाला भेटायला आले आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
तसेच दुसरीकडे अजित पवारांचा गटही नवाब मलिकांच्या भेटीला आला होता. अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नवाब मलिकांची भेट घेतली. पण या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे प्रफुल्ल पटेलांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवाब मलिकांनी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या तरी कोणत्याच गटात जाणार नसल्याचे नवाब मलिकांनी स्पष्ट केलं आहे. ते सध्या आरोग्यवर लक्ष देणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. नवाब मलिकांवर सध्या कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहे.