Nupur Shikhar : जिममध्ये झालं प्रेम अन् आता केलं लग्न, अमीर खानचा जावई नुपूर शिखरे कोण आहे? वाचून धक्काच बसेल…

Nupur Shikhar : दिग्गज बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधत आहे. दोन्ही कुटुंबांची घरे सजवली आहेत. आणि सर्व विधी सुरू आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. आता सर्वांनाच उत्सुकता आहे की आमिरचा जावई कोण आहे आणि तो काय करतो?

आमिर खानचा जावई नुपूर शिखरे हा बॉलिवूडचा प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. त्याने अनेक बॉलिवूड स्टार्सना फिटनेस ट्रेनिंग दिले आहे. नुपूर आयरा खानचा ट्रेनरही आहे. तिच्या फिटनेसवर काम करताना हे जोडपे प्रेमात पडले आणि तेव्हापासून ते एकत्र आहेत.

या दोघांनी 2022 मध्ये लॉकडाऊन दरम्यान एंगेजमेंट केली होती. नुपूर शिखरनेही आमिर खानला ट्रेनिंग दिले आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेस सत्राचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत आणि आयराने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिचे प्रेम व्यक्त केले आहे.

या जोडप्याने ख्रिसमस आणि दिवाळी एकत्र साजरी केली आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. नुपूरने आयराचा चुलत भाऊ झैन खान याच्या लग्नाचा सोहळाही साजरा केला आणि लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले. आयराने तिच्या हातावर नुपूरच्या नावाचा टॅटूही बनवला आहे. दोघांची पहिली भेट जिममध्ये झाली होती आणि याचदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

लॉकडाऊन दरम्यान, आयरा आणि नुपूरमध्ये खूप चांगले बाँडिंग सुरू झाले. सप्टेंबर 2022 मध्ये नुपूरने सायकलिंग इव्हेंट दरम्यान आयराला प्रपोज केले. एका वर्षाच्या एंगेजमेंटनंतर हे जोडपे लग्नबंधनात अडकले आहे.

हा विवाह सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मोजकेच लोक उपस्थित होते. यावेळी आमिर खानची पत्नी देखील उपस्थित होती. काही दिवसांपूर्वी ते वेगळे झाले आहेत. मात्र यावेळी ती देखील उपस्थित होती.