Pakistan Crime News: मृत्यूचे तांडव! एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू ; ह्रदय पिळवटणारी घटना

Pakistan Crime News: पाकिस्तान मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका गावात एका कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्की मारवत जिल्ह्यातील तख्ती खेल नावाच्या गावात ही घटना घडली. मृत कुटुंबात दोन भाऊ, त्यांची मुले आणि त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी प्राथमिक चौकशी केली असता असे समोर आले की, दोन दिवसांपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने वझिरीस्तानमधून जेवण आणले होते, जे खाल्ल्यानंतर सर्वांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, हल्लेखोर हा पीडित कुटुंबाशी संबंधित असू शकतो, कारण त्याने घरात घुसून ही घटना घडवून आणली आहे. घटनेनंतर हल्लेखोराने घराचे गेट बाहेरुन बंद करुन तेथून पळ काढला.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर दोन दिवसांनी मृताचा भाऊ घरी परतला असता त्याला घराचे गेट बाहेरुन बंद असल्याचे दिसले. काही अनुचित घटनेच्या भीतीने त्याने पटकन गेट उघडले. त्यावेळी त्याला घरातील सर्व सदस्यांचे मृतदेह दिसले, त्यानंतर त्याने तत्काळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी या घटनेचा आसपासच्या भागात तपास सुरु केला आहे. त्यांनी घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.