पालघरच्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती! जमावाची साधूंना बेदम मारहाण, साधुंची हात जोडून गयावया, पण…

पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी उत्तर प्रदेशच्या तीन साधुंना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. साधूंना अपहरणकर्ते समजून स्थानिकांनी त्यांना बेदम मारले आहे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याठिकाणी पोलीस वेळेत पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि साधुंचा जीव वाचला. पोलिसांनी जमावापासून साधुंची सुटका केली आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेले. ते सध्या जखमी झाले आहेत.

हे तीन साधू, एक व्यक्ती आणि त्याचे दोन मुले स्नान करण्यासाठी गंगासागरला जात होते. ते रस्ता चुकले. त्यांनी तीन तरुणांना रस्ता विचारला. मात्र तरुणांना शंका आली. त्यानंतर स्थानिकांनी साधुंना पकडले आणि त्यांना मारहाण सुरू केली. काहींनी याबाबत पोलीसांना माहिती दिली.

यामुळे पोलीस याठिकाणी पोहोचले. त्यांनी जमावापासून साधुंचा जीव वाचवला आणि त्यांना घेऊन काशीपूर पोलीस ठाणं गाठले. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मारहाणीत सहभागी असलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. अटकेत असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून साधूंचा बचाव केला.

दरम्यान, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात संतप्त जमाव साधुंच्या वाहनांचीदेखील तोडफोड करताना दिसत आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे.