नाशिकच्या उमेदवाराबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य, थेट नाव सांगून वाढवलं गोडसे अन् भुजबळांचे टेन्शन…

महायुतीमध्ये अजून देखील नाशिकच्या जागेबाबत घोषणा झाली नाही. यामुळे याठिकाणी कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत. तसेच छगन भुजबळ यांचे नाव देखील घेतले जाते. अशातच आता याठिकाणी एक नाव पुढे आले आहे.

आता भाजप नेत्या आणि बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होणार नाही, वेळ आली तर प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करु, अशी जाहीर घोषणा केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले आहे.

यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा नव्याने चर्चेत आला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीला उमेदवार सापडत नाही, ही अडचण नसून खूप उमेदवार आहेत ही अडचण असल्याचं म्हटलं आहे. यामुळे नेमकं कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याठिकाणी हेमंत गोडसे हे मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. ते अनेकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. वंजारी उमेदवार देण्याची वेळ आली तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून तीन वंजारी उमेदवार इच्छुक असल्याचीही माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात लक्ष घालावे. 13 तारखेला निवडणूक आहे. त्यांना निवडून यावं लागेल.

यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असा सल्ला भुजबळांनी दिला. दरम्यान, याठिकाणी सर्वच पक्ष इच्छुक आहेत. यामुळे येणाऱ्या काळात उमेदवार निश्चित होईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इच्छुकांनी प्रचार देखील सुरू केला आहे.