Parbhani News : आईने पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाला आला राग, रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य…

Parbhani News : परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने पैसे न दिल्याच्या रागातून आईवर हल्ला केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ५ हजार रुपये मागितले असता आईने पैसे न दिल्याने मुलाने आईलाच शिवीगाळ करून धमकी दिली.

याबाबत पोलिसांनी तपास केला आहे. याबाबत आईने तक्रार दाखल केली आहे. मुलाने लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या फिर्यादीत असे म्हटले आहे, २६ नोव्हेंबरला ६ वाजता मुलगा दत्ता लक्ष्मण भवर याने फिर्यादी आईस ५ हजार रुपये मागितले होते.

असे असताना आईने मुलाला पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याने मुलाने आईवर हल्ला केला आहे. यात आई जखमी झाली आहे. आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गयाबाई लक्ष्मण भवर (रा. दत्तनगर, सेलू) असे या महिलेचे नाव आहे.

त्यांच्यावर परभणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईवर दोन्ही पायावर, डाव्या हाताचे कोपरावर, पाठीवर मारहाण करून फैक्चर करून गंभीर दुखापत केली आहे. घटनेनंतर आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी पो. नि. एस. के. चवरे यांच्या आदेशाने सेलू ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी किर्तेश्वर तेलंगे घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र परभणी मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्यात राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे अशा प्रकारे अनेक घटना रोज घडत आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष घालून अशा प्रकारे घटना थांबवल्या पाहिजेत. याबाबत वचक निर्माण झाला पाहिजे.