मृत्यूपूर्वी ‘तो’ आवाज काढतात लोक, ऐकणंही कठीण! नर्सचा धक्कादायक खुलासा…

मनुष्य जातीचा एक शेवट ठरलेला असतो. तो जन्माला येतो तसच त्याचा मृत्यू देखील अटळ आहे. मृत्यूपूर्वी प्रत्येकाला एक नैसर्गिक संकेत मिळतो असं म्हटलं जातं. मरणाच्या दारात असताना व्यक्ती कशाप्रकारे आवाज करतात याबद्दलचा धक्कादायक खुलासा रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सने केला आहे.

यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मृत्यूपूर्वीच्या आवाजाला डेथ रॅटल असे म्हणतात. याबाबत ज्यूली मॅकफॅडेन नावाच्या नर्सने काही धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत. ती म्हणाली, मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीला मृत्यूला घाबरु नका.

टिक-टॉकवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ज्यूलीने लोक मरण पावण्याआधी कसे आवाज काढतात हे सांगितले, ती म्हणाली रुग्णांनी असे आवाज काढणे ही मृत्यूची चाहूल असते. ही फार सामान्य बाब आहे. यात वेगळं अस काहीही नाही.

रुग्ण प्राण सोडण्याआधी हा आवाज माझ्या कानावर पडतो. मात्र तुम्ही असा आवाज यापूर्वी कधी ऐकला नसेल तर तुम्हाला तो फारच भयानक आणि भयावह वाटेल. आपल्या शरीरामध्ये 24 तास लाळ तयार होत असते. आपला मेंदू ही लाळ गिळण्यास सांगत असतो.

तेव्हा तोंडात लाळ तयार होत असते मात्र मेंदू ही गिळण्याची सूचना करत नाही. मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तीचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळेच व्यक्तीला काहीही गिळता येत नाही. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असलेली व्यक्ती तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करते.

अशावेळी गुळण्या करत असल्यासारखा ‘गळ्.. गळ्… गळ्…’ असा आवाज येतो. अनेकदा मृत्यूच्या काही क्षण आधी व्यक्तीच्या घशातून हा निघतो, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांना रुग्णांच्या सेवेबाबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे.