Petrol: पेट्रोल-डिझेल भरण्याची पण वेळ असते का? चूकीच्या वेळी इंधन भरल्यास मायलेजमध्ये फरक पडतो का? वाचा सत्य माहिती

Petrol: कार किंवा बाईकच्या मायलेजबाबत अनेकजण चिंतेत असतात. गाडीची मायलेज वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात. वेळोवेळी देखभाल करूनही मायलेज कमी पडू शकते. अशावेळी अनेक तज्ज्ञ पेट्रोल भरण्याची वेळ महत्त्वाची असल्याचे सांगतात.

पेट्रोल भरण्याची वेळ देखील महत्त्वाची असल्याचे म्हटले जाते. सकाळी किंवा रात्री पेट्रोल भरल्याने जास्त मायलेज मिळते, असे काही लोकांचे म्हणणे आहे. पण हे खरे आहे का?

पेट्रोलची डेंसिटी म्हणजे त्याचे घनता, तापमान वाढल्याने इंधनाची घनता कमी होते. त्यामुळे सकाळी पेट्रोल भरल्याने त्याचे प्रमाण जास्त असते आणि मायलेज चांगले होते असे मानले जाते. पण हे खरे नाही.

पेट्रोल आणि डिझेलची डेंसिटी सरकारने ठरवली आहे. सकाळी किंवा रात्री यावर काहीही परिणाम होत नाही. पेट्रोल पंपावर असलेल्या मशीनवरून तुम्ही पेट्रोलची डेंसिटी तपासू शकता. ती सरकारने ठरवलेल्या प्रमाणाशी जुळत असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणात पेट्रोल मिळत आहे असे समजायचे.

पेट्रोल पंपावरील टँक जमिनीत असतात. त्यामुळे दिवसा किंवा रात्री याचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे पेट्रोल भरण्याची वेळ मायलेजवर परिणाम करत नाही. तर मग पेट्रोल भरण्याची वेळ महत्त्वाची आहे का? तर त्याच उत्तर नाही आहे. पेट्रोल भरताना तुम्हाला योग्य प्रमाणात पेट्रोल मिळत आहे याची खात्री करावी.

पेट्रोलची डेंसिटी ७३० ते ८०० किलोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर इतकी असते. डिझेलची डेंसिटी ८३० ते ९०० किलोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर इतकी असते. या डेंसिटीचे पेट्रोल आणि डिझेल शुद्ध मानले जाते. तापमानाचा या डेंसिटीवर कोणताही परिणाम होत नाही.