सकाळी मित्रांसोबत क्रिकेट, सायंकाळी फुटबॉल खेळला, अन् संध्याकाळी केलं धक्कादायक कृत्य, घटनेने सगळेच हादरले…

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलाने पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणारा मुलगा हा दहावीचा विद्यार्थी होता.

त्याने असे का केले याबाबत अजून काही माहिती समोर आली नाही. त्याने स्वत:च्या छातीवर पिस्तुल ठेवली आणि मग गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली. त्याच्या खोलीत त्याचा मृतदेह दिसून आला आहे.

फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. त्याचबरोबर पोलिसही याप्रकरणात वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. घटनेच्या वेळी मुलगा घरी एकटाच होता असे सांगण्यात येत आहे. तो कॉलनीत मित्रांसोबत सकाळी क्रिकेट आणि दुपारी फुटबॉलही खेळला.

त्याने आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांना मेसेज केला होता, ज्यामध्ये त्याने ‘सॉरी पप्पा’ असे लिहिले होते. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आई-वडील घरी पोहोचले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. वडील प्रदीप आर्जिया यांनी दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली.

मुलाने दार न उघडल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडण्यात आले. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. खोलीत त्यांचा मुलगा हा जमिनीवर पडलेला होता. खोलीत सगळीकडे रक्त झाले होते. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याला मृत घोषित केले.

मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत पोलीस सखोल माहिती घेऊन तपास करत आहेत. या घटनेने मात्र कुटूंबाला मोठा धक्का बसला. त्याचा शाळेत जाऊन पोलीस माहिती घेत आहेत.