Politics : शिंदे गटातील ७ खासदार, काॅंग्रेसचे ९ बडे नेते…; राज्याच्या राजकारणच पुन्हा भूकंप, पक्षांतराची लाट

Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वर्षातही उलथापालथ सुरूच आहे. शिंदे गटाचे ७ खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर, काँग्रेसचे ९ नेते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार?
माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला आहे. तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणंय. मात्र, या दाव्याला शिंदे गटाचे खासदार अद्याप प्रत्युत्तर देऊ शकलेले नाहीत.

काँग्रेसचे ९ नेते शिंदे गटात?
उद्योगमंत्री उदय सामतांनी काँग्रेसचे ९ लोकं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा केला आहे. या नेत्यांची नावे सामत यांनी जाहीर केली नाहीत. मात्र, या दाव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढणार
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली आहे. मविआशी आपल्याला काहीही देणघेणं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो होते असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रुपाली चाकणकरांना रोहिणी खडसेंचे आव्हान
रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळे गेली 15 वर्षे अजितदादांमुळेच निवडून आल्यायत. आता अजितदादा सोबत नाही म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं विधान काल रुपाली चाकणकरांनी केलं होतं. त्यावरुनच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधलाय.

रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं रोहिणी खडसेंनी आव्हान दिलंय. या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होतं की महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.