Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा? पाहा फोटो…

Pooja Sawant : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अभिनेत्री पूजा सावंत विवाहबंधनात अडकणार आहे. इन्स्टाग्रामवर जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत तिने साखरपुडा झाल्याची घोषणा केली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली असून फोटो व्हायरल होत आहेत.

पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात तिने We are engaged असे म्हणत काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत ती आणि एक मुलगा दिसत असून यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे. यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, पूजाने सलग तीन इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील सर्व फोटोत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे पूजाचा होणारा नवरा कोण, अशी चर्चा सध्या रंगली आहे. तिने कोणालाही याबाबत कळवले नाही.

असे असताना पूजाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार यावर कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये हेमंत ढोमे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, पुष्कर जोग यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, पूजा सावंतने तिचे रिलेशन कायम गुलदस्त्यात ठेवले. इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्र-मंडळींना मात्र याबाबत माहिती होते. अभिनेत्रीने फोटो शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.

तसेच पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या लग्नासाठी चाहते आता उत्सुक आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.