Prajakta Mali : ‘तेव्हा मी त्याला रंगेहाथ पकडलंही होतं… ‘, एक्स बॉयफ्रेंड विषयी प्राजक्ता माळीचा धक्कादायक खुलासा

Prajakta Mali : ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. ती तिच्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावासाठी ओळखली जाते. ती तिच्या लव लाइफबद्दलही नेहमीच खुलेपणाने बोलले आहे. आता तिने तिच्या भूतकाळातील एका रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. प्राजक्ता माळी चाहत्यांशी कनेंक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत असते.

प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडला खोटं बोलण्याची सवय होती. प्राजक्ता म्हणाली की, “तो माझ्याशी नेहमी खोटं बोलायचा. मी त्याचं खोटं पकडलं देखील होतं. पण तो ते मान्य करतच नव्हता. खोटं बोलणे हे एक मोठं पाप आहे. तुमच्यात खरं बोलण्याचीही हिंमत पाहिजे.”

प्राजक्ताने एका मुलाखतीत लग्नाबद्दलही तिचे मत व्यक्त केले. तिने सांगितले की, “मला लग्नच करायचं नाही. कारण डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्नच करायचं नाही. तुमचा लाइफ पार्टनर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुमचं जगणं, भविष्य, मेंटल हेल्थ सगळंच बदलतं. त्यामुळे मला असं वाटतं की, लग्न ही एक रिस्क आहे.”

प्राजक्ताच्या या खुलाशामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण तिच्या या बोलण्यानं तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक देखील झालं आहे. प्राजक्ता माळीच्या प्रेमकथेतून आपल्याला हे शिकण्यासारखे आहे की, प्रेमात असताना एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि एकमेकांना आधार देणे खूप महत्त्वाचे आहे.

प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचं तर ती ‘पांडू’, ‘चंद्रमुखी’, ‘लकडाऊन बी पॉजिटीव्ह’, ‘खो- खो’ या चित्रपटात झळकली आहे. तर साध्य ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये निवेदिकेच्या भूमिकेत दिसत आहे. एवढंच नव्हे तर तिने ‘रानबाजार’ या सीरिजमध्येही काम केलं आहे.