देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. आतापर्यंत पाच टप्पे झाले आहेत. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे. आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदानानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता 4 जूनला निकाल लागणार आहे. निकालाच्या आधीच लोकांची उत्सुक्ता वाढली आहे. आता राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल अंदाज व्यक्त केले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल काही अंदाज वर्तवले आहेत.
त्यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा, लोकसभेला राजकीय व्युहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे. यामुळे भाजपला धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपाला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे, पण त्यांना जवळपास 300 जागा मिळतील, असं प्रशांत किशोर म्हणाले. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपाला 370 जागा मिळतील. एनडीए 400 पार जाईल, त्या दिवशी मी म्हणालो हे शक्य नाही, असेही ते म्हणाले.
तसेच राज्यात विरोधी पक्षाला असं वाटतय की 20-25 जागा जिंकतील. विरोधी पक्षाने 25 जागा जिंकल्या, तरी त्यामुळे भाजपाच काही विशेष नुकसान होणार नाही. राज्यात भाजपाकडे 48 पैकी 23 च खासदार आहेत. अशावेळी महाराष्ट्रात मविआने जास्त जागा जिंकल्या तरी त्यामुळे भाजपाला विशेष नुकसान होणार नाही.
दरम्यान, आता अनेकांनी पैजा लावल्या आहेत. 4 जूनला याबाबत परिस्थिती समोर येणार आहे. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात आहे. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही मतदार संघात विशेष करून बारामतीत मोठी लढत होणार आहे.