Prime Minister Modi : ‘पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये जाणं हे काही..’; रवी शास्त्री स्पष्टच बोलले, म्हणाले…

Prime Minister Modi : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. एकेकाळी भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण, ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.

भारतीय संघाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले होते. यावर रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रवी शास्त्री म्हणाले, “ड्रेसिंग रूममध्ये क्रिकेटर असण्याबरोबरच मी अनेक वर्षांपासून प्रशिक्षकही आहे.

खूप वाईट वाटत जेव्हा इथपर्यंत पोहोचल्यावर आउट होऊन बाहेर जाण. पण जेव्हा तुम्हाला निराश वाटते आणि अशा वेळी देशाचे पंतप्रधान स्वतः तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये येतात, तेव्हा ही मोठी गोष्ट आहे.

शास्त्री पुढे म्हणाले, “पंतप्रधानांचे ड्रेसिंग रूममध्ये येणे म्हणजे खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्यासारखे आहे. कारण पंतप्रधान ड्रेसिंग रूममध्ये जाणे हे कोणत्याही सामान्य माणसासारखे नाही.

पंतप्रधानांच्या भेटीबद्दल खेळाडूंना कसे वाटले असेल याची मला कल्पना आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना मी हे यापूर्वी पाहिले आहे.” फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसले.

यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली निराश दिसत होते. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पंतप्रधान मोदींच्या भेटीत अश्रू आवरता आले नाहीत. शमीचे डोळे भरून आले आणि पंतप्रधानांनी त्याला मिठी मारली. जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रोत्साहन दिले.