Pune Accident : दोघांचे एकमेकांवर प्रेम, बाशिंग बांधायला गेले पण घडलं भयंकर, क्षणात सगळं संपलं…

Pune Accident : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटात प्रियकराशी लग्न करण्यासाठी निघालेल्या ट्रक चालकाचा जीव गेल्याची संतापजनक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत तपास सुरू आहे. रामेश्वर लक्ष्मण शिंदे असं या चालकाचे नाव असून तो त्याच्या जोडीदारासोबत प्रेमविवाहासाठी जात होता. मात्र, शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. यामुळे एकच धक्का बसला.

त्यांना आधीच घरातून प्रेमविवाहासाठी विरोध होता. दरम्यान, आधीच विवाहित असलेली ही महिला पतीला सोडून आई-वडिलांच्या घरी राहत होती. त्यांच्या आंतरजातीय विवाहासाठी जात असताना असे घडले.

हा ट्रक लोणी काळभोरजवळील शिंदवणे घाटात येत होता. तेव्हा वळणाचा अंदाज न आल्याने ब्रेक फेल झाला. यामुळे ट्रक जागेवरच पलटी झाला. यामध्ये ट्रकचालक रामेश्वर शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली पायल शेख अपघातात जखमी झाली आहे.

यामुळे नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात आले आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या नातेवाईकांनी ती हरवल्याची तक्रार मिरज पोलीस चौकीत दाखल केली होती. रामेश्वर शिंदे परभणीचा आहे तर, प्रेमीका पायल शेख ही सांगलीची आहे.

नव्या आयुष्याची सुरूवात करण्यासाठी पायल ही घर सोडून आली होती. महिलेच्या पायाला झालेल्या दुखापतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत.