Pune Accident : भयंकर! पुण्यातील चौकामध्ये थरकाप उडवणारा अपघात; Video पाहून काळीज फाटेल

Pune Accident : पुण्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे सिग्नल तोडण्यावर काय भयंकर परिणाम होतात, हे समोर आले आहे. पुण्यातील येरवडा चौकात भीषण अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

एका दुचाकी चालकाला ढंपरने उडवले आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे अंगावर काटा उभा राहत आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचे दोन पाय निकामे झाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचे आव्हान केले जातं आहे. यामुळे घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

येथील जीएसटी भवन वरुन येरवडाला जाणाऱ्या रस्त्यावर गोल्फ चौक परिसरात सिग्नल लागला असताना एक दुचाकीस्वार रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. सिग्नल असल्याने त्याला मागून येणारे वाहन दिसून आले नाही. त्यावेळी सिग्नलला पीएमपीएल बस उभी असते.

असे असताना सिग्नल जुगारून दुचाकीस्वाराने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी काळाने घात केला. ढंपर वेगाने आल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे. चालकाने समोरून येत असलेल्या दुचाकीस्वाराकडे पाहिलं नाही अन् मोठा अनर्थ घडला.

हा दुचाकीस्वार ढंपरच्या चाकाखाली आला. यामध्ये गाडीचा देखील चुराडा झाला आहे. दुचाकी चालकाचे पाय देखील निकामे झाल्याची माहिती मिळाली आहे. याचा विडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहन चालकांकडून वाहतुकीचे सर्व नियम धब्ब्यावर बसवतात. यामुळे वाहतूक व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. अनेकांचे जीव यामध्ये जात आहेत.