Pune Crime: बिल्डरने दिल्या सासऱ्यासमोर तरुणाला शिव्या, तरुणाने केलं भयंकर कृत्य, घटनेने सगळेच हादरले…

Pune Crime: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बिल्डर मालकाने सासऱ्यासमोर गलिच्छ शिवीगाळ केल्याने अपमानित झालेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. त्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत सासरच्या लोकांसमोर आपल्याला नाहक अपमानित केल्याने मी आत्महत्या करत असल्याचे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आज मी आत्महत्या करणार आहे. याचे कारण आहे. अरबाज मोहम्मंद अली ज्याच्याकडे मी काम करत होतो. त्याने मला खुप टॉर्चर केले.

माझी काही चुकी नसताना त्याने मला अपमानित करत माझ्या सासरच्यांसमोर मला आई- बहीणीवरून शिव्या दिल्या. तसेच मला त्यांनी जीवे मारण्याचीही धमकी दिली. अरबाज अली हा खूप बेकार माणूस असून तुम्ही कोंढव्यातील कोणत्याही कामगाराला जाऊन विचारा तो कसा व्यक्ती आहे ते ? तो कोणा कोणाला कशा शिव्या देतो याची माहिती तुम्हाला मिळेल.

कुठेही जा माझे कोणी काही करून शकत नसल्याबाबत धमकावल्याचे व्हिडीओत म्हटले आहे. तोहिद मेहमूद शेख (26, कोंढवा) असे आत्महत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अरबाज मोहम्मदअली मेमन याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तोहिद याने कौसर बाग येथील गॅलेक्स प्रीमियम या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत बिल्डरवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनेची माहिती मिळताच बिल्डर फरार झाला आहे. याबाबत पोलीस शोध घेत आहेत.