Pune news : पुण्यात अभिनेत्रीच चालवत होती वेश्या व्यवसाय, २ मॉडेलही अटकेत, उडाली खळबळ…

Pune news : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी वेश्याव्यवसायाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणात एका अभिनेत्रीसह तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्रीची सध्या चौकशी सुरू आहे.

या राजस्थानी अभिनेत्रीसह दोन मॉडेलला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील विमाननगर परिसरातील पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. उजबेकीस्थानमधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या.

पुणे पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी राजस्थानी अभिनेत्री आणि उजबेकीस्थानमधून आलेल्या मॉडेलला या प्रकरणात अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांना सुगावा लागला होता.

या तिन्ही महिला आरोपींनी पुण्यातील विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरु केला होता. अनेक लोकं याठिकाणी जात असल्याचे सांगितले आहे. विदेशातून ऑनलाइन माध्यमातून त्या वेश्या व्यवसाय भारतात चालवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

वेश्या व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवणाऱ्या आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू असल्याचे प्रकार उघड झाले होते.