Pune news : ब्रेकिंग! पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरार, गुंड शरद मोहोळवर गोळीबार…

Pune news : पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी भरदिवसा गोळीबार झाला आहे. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली.

अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला असून शरद मोहोळ यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

असे असले तरी गॅंगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे. शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तो राजकारण शिरण्याचा प्रयत्न सध्या करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.