Pune news : आईमुळे मुलीचा झाला ब्रेकअप, संतापलेल्या मुलाने गर्ल्डफ्रेण्डच्या आईलाच संपवल, पुण्यात उडाली खळबळ

Pune news : पुण्यात एका प्रियकराने प्रेयसीबरोबर झालेल्या ब्रेकअपच्या रागातून एक धक्कादायक कृत्य केलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्याने संतापलेल्या या तरुणाने आपल्या प्रेयसीच्या आईचीच हत्या केली.

आईचा या नात्याला विरोध होता. यामुळे आपण ब्रेकअप करु असं म्हणत या तरुणीने प्रियकराबरोबर ब्रेकअप केलं होतं. यामुळे राग मनात ठेऊन प्रेयसीच्या आईमुळेच ब्रेकअप झाल्याचा सूड घेण्यासाठी प्रियकराने तिची हत्या केली.

पाषाण सुस मार्गावरील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. हत्या झालेली महिला तिच्या मुलीबरोबर राहत होती.

वर्षा क्षीरसागर या त्यांची 22 वर्षीय मुलगी मृण्मयी क्षीरसागरबरोबर राहत होत्या. एका डेटींग अ‍ॅपवरुन ओळख झालेल्या शिवांशु दयाराम गुप्ता या 23 वर्षीय मुलाला ती डेट करत होती. दोघांची पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्यांच्यातील गप्पा आणि मैत्री वाढत गेली आणि ते प्रेमात पडले.

नंतर मृण्मयीला तिचा प्रियकर डिलेव्हरी बॉय म्हणून करतो असं समजलं. यामुळे आईने तिला समजवून सांगितले. यामुळे तिने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुलाला राग आला, यातून त्याने आईला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

आई घरी असताना तो घरी आला व गळा दाबून तो पळून गेला. यानंतर मुलीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलाला त्याच्या घरातून अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.