Pune News : पाण्यात पडलेल्या मैत्रिणीला वाचवायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, दुःखद घटनेने पुणे हळहळलं…

Pune News :.पुण्याच्या पानशेत धरण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी पानशेत धरणाजवळ असलेल्या पुलाजवळ धरणात अठरा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.

याबाबत माहिती अशी की, मैत्रिणींना वाचवण्याच्या नादात त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच त्याने मृत्यूला कवटाळले असल्याची भावना परिसरातील नागरिकांडून व्यक्त करण्यात येत होती. सकाळच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पानशेत धरण परिसरात आला होता.

असे असताना सेल्फी काढण्याच्या नादात त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. मात्र त्या पाण्यात पडल्याचे पाहून ज्ञानेश्वर याने पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

याबाबत वेल्हे पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या घटनेने खराडी परिसरावर शोककळा पसरली आहे. मित्र आणि मैत्रिणींनी फिरायला जाताना पाण्याच्या कडेला जाऊ नये. जर पोहायला येत नसेल तर पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, असे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा धरण क्षेत्रात असणाऱ्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सेल्फी काढताना मैत्रिणीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. ही बातम्या याठिकाणी असलेल्या लोकांना समजल्यावर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

घटनेनंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला होता. याबाबत पोलीस तपास करत आहेत.