Pune News: संतापजनक घटनेने पुणे हादरलं! मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार, कपडे काढायला लावले अन्…

Pune News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मामीला अटक करण्याता आली आहे. २ वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेची चर्चा सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करायची.

तिच्यावर लैंगिक अत्याचा देखील करत होती. सदर घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. मुलीच्या आईने तिला आपल्या भावाच्या घरी ठेवले होते. तेव्हा हा प्रकार घडला आहे. भाऊ हवाई दलात नोकरी करत असून तो आपल्या कुटुंबासह हवाई दल वसाहतीत राहतो.

दरम्यान, कोरोना काळात ही घटना घडत होती. कोरोना काळानंतर मुलगी पुन्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, पोलीस म्हणाले, की मामी चिमुकलीला मारहाण करायची. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. यामुळे मुलगी घाबरली होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत मामी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.