Pune News : गुप्तांग कापून रस्त्यात फेकले, पुण्यातील अर्भकासोबत धक्कादायक घडलं, ससूनमध्ये उपचार सुरू…

Pune News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मूल जन्मल्यावर आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी त्याच्या रक्तामासाच्या माणसांनीच त्याला मृत्यूच्या छायेत ढकलून दिल्याची घटना घडली आहे. गुप्तांग कापून रस्त्यावर टाकून दिलेल्या नवजात अर्भकाचा गेल्या सात दिवसांपासन मृत्यूशी लढा सुरू आहे.

अर्भकावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकारामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार मुळशी तालुक्यातील पौड येथे घडला आहे. याबाबत तपास सुरू आहे.

पुण्यात रस्त्यावर गुप्तांग कापून या अर्भकाला रस्त्यात फेकले होते. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मुळशी येथील अकोले-शेरेगावमध्ये असलेल्या पेट्रोल पंपाजवळील एका शेतामध्ये नागरिकांना बेवारस अर्भक मिळून आले. यामुळे तपास सुरू होता.

या अर्भकाच्या अंगावर जखमा होत्या. तसेच त्याचे गुप्तांग कापण्यात आल्याचेही दिसून आले. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी तपास सुरू केला होता.

तसेच पोलिसांनी त्यांनी अर्भकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले. या अर्भकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे गुप्तांग कापण्यात आले. तसेच अन्य जखमा देखील केल्या आहेत. पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अर्भक रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याचे वजनही खूपच कमी होते. त्यामुळे अर्भक किती दिवसांचे असेल, याचे अंदाज डॉक्टरांना लावता येत नव्हता. याबाबत प्रयत्न सुरू आहेत.