चिता जळत होती, अन् तेवढ्यात अपघात होऊन तो थेट चितेवरच येऊन पडला, घडलं भयंकर…

बिहारच्या गोपालगंज येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ज्याने आपल्या डोळ्याने पाहिली त्याच्या अंगावर काटा आला. गोपालगंज कुचायकोट पोलिस स्टेशन हद्दीतील सासामुसा येथे अचानक एका दुचाकीला अपघात झाला.

यामुळे दुचाकीवरील एक जण पुलाखाली कोसळला. याचवेळी पुलाखाली चिता पेटलेली होती. यामुळे याठिकाणी अनेकजण उपस्थित होते. ही व्यक्ती थेट त्या चितेवर जाऊन पडली. यामुळे अनेकांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी बघितली.

जवळच उभ्या असलेल्या लोकांचं जेव्हा चितेकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांना चितेमध्ये काही हालचाल होत असल्याचे लक्षात आले. यामुळे त्यांना धक्काच बसला. चितेमध्ये हालचाल कशी होत आहे. असा प्रश्न त्यांना पडला.

नंतर त्यांनी जवळ येऊन पाहिलं तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला. त्या चितेवर एक जिवंत व्यक्ती पडलेला होता. हा व्यक्ती अपघातामुळे याठिकाणी पडला आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. त्याला लगेच तात्काळ त्या व्यक्तीला चितेतून बाहेर काढले.

या घटनेत तो चांगलाच भाजला गेला होता. त्याता सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. तसेच या घटनेत दुचाकीस्वार दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला आहे.

या गावात राहणारे वकील प्रसाद हे त्यांच्या पुतण्या शिवमसोबत बाईकवरून यूपीमधील साहेबगंज येथे पत्नीसाठी औषधं घेण्यासाठी गेले होते. पत्नीच्या हृदयविकाराचे औषध घेऊन ते घरी परतत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यावेळी त्यांचा अपघात झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.