टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा आशिया कप नावावर केला. त्याचबरोबर आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी द्रविड यांचा सल्ला मोलाचा ठरेल. सध्या टीमची वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे.
पुढील महिन्यापासून भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होणार आहे. त्याआधी संघ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेच्या मध्यावर राहुल द्रविडसाठी आनंदाची बातमी आली आहे.
राहुल द्रविडचा मुलगाही त्याचाच मार्ग अवलंबला आहे. कर्नाटकच्या अंडर-19 संघात समित द्रविडची निवड झाली आहे. ही 19 वर्षांखालील स्पर्धा 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे.
कर्नाटकचे कर्णधार धीरज जे. गौडा असतील तर ध्रुव प्रभाकर उपकर्णधार असतील. 18 वर्षीय समित याआधी अंडर 14 स्पर्धेत कर्नाटककडून खेळला आहे. पण अंडर-19 स्तरावर तो खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल द्रविड वरिष्ठ स्तरावर खेळण्यापूर्वी अंडर-15, अंडर-17 आणि अंडर-19 मध्ये राज्य स्तरावर खेळला होता. त्यानंतर 1991/92 च्या मोसमात रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. वडिलांप्रमाणे समित हा उजव्या हाताचा फलंदाज आहे.
2019 मध्ये समितने कर्नाटक इंटर झोन स्पर्धेत द्विशतक झळकावले होते. यामुळे आगामी काळात टीम इंडियामध्ये देखील त्याचा समावेश होऊ शकतो. यामुळे आता त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.