काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत अनेकदा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. ते नेमकं कधी आणि कोणाबर लग्न करणार याची चर्चा अनेकदा सुरू असते. आता राहुल गांधी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहुल गांधी लग्न करणार असल्याच्या अफवांना सोशल मीडियावर उत आला आहे. यातच त्यांचे संसदेतील फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार आहेत.
प्रणिती शिंदे देखील अविवाहित आहेत. प्रणिती यांनी आपल्या खासगी आयुष्याविषयी कधीच भाष्य केलं नाही. मात्र त्यांचे नाव राहुल गांधी यांच्यासोबत सतत जोडले जाते. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल आणि प्रणिती एकत्र चालतानाचे काही फोटोही मॉर्फ करुन शेअर करण्यात येत आहेत.
असे असताना मात्र याबाबत दोन्ही परिवारांपैकी कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र याबाबत आता अधिकृतपणे कोणीही बोलले नाही. प्रणिती शिंदे या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. ते माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री राहिले आहेत. यामुळे त्यांचं आणि काँग्रेसच्या गांधी घराण्याचे चांगले संबंध आहेत.
४३ वर्षीय प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. यावेळी त्यांनी खासदारकीला बाजी मारली. यामुळे त्या सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार झाल्या. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला.
दरम्यान, सोलापूरच्या या जागेवरून आधी भाजप नेते डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी खासदार होते. मात्र यावेळी त्यांचे तिकीट कापले होते. दरम्यान, त्यांच्या लग्नाची केवळ अफवा असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली आहे.