काका पुतण्याच्या वादात मोठा ट्विस्ट, विधानसभा अध्यक्षांचे धक्कादायक वक्तव्य; कुणाची विकेट पडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत हात मिळवणी केल्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मंत्री झालेल्या ९ आमदारांना अपात्र करण्याबाबतची नोटीस विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दिली आहे.

आता या संपूर्ण प्रकरणावर राहूल नार्वेकरांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी हा शिवसेना-भाजप सरकारचा भाग की अजूनही तो विरोधीपक्षच आहे. हे अजून निश्चित झालेले नाही, असे राहूल नार्वेकरांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीचा खरा नेता कोण हे अजून पाहायचे आहे. जर कोणी अपात्रतेच्या प्रकरणी याचिका दाखल केली तर तो त्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही.

आम्ही जो निर्णय घेऊ तो न्याय देणाराच असेल. त्यात कोणत्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही. आम्ही सर्व नियमांचे पालन करुन योग्य तो निर्णय योग्य त्या वेळी घेऊ, असेही नार्वेकर यांनी म्हटले आहे.

तसेच अजित पवारांना किती आमदारांचा पाठिंबा आहे? असा प्रश्न राहूल नार्वेकरांना विचारण्यात आला होता. त्यावेळी राहूल नार्वेकरांनी हैराण करणारे उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी लेखी संवाद न साधल्याने मला याबाबत माहिती नाही. राज्य विधानसभेत पक्षानूसार असलेले संख्याबळ पूर्वीसारखेच आहे.