Raigad Accident : मोठी बातमी! पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली, काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात

Raigad Accident : रायगड जिल्ह्यात पुण्यातून येणारी बस माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामध्ये ५५ जण जखमी झाले आहेत. तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे मोठी पळापळ झाली. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत होती. यावेळी रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन हा अपघात झाला आहे.

हा अपघात1अचानक झाला. अपघातानंतर घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली. यावेळी बस पूर्णपणे पलटी झाली होती. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे.

याअपघातामुळे मार्गावरही वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटनाला जात असताना बसला अपघात झाला आहे. पुणे येथील कंपनीची सहल खाजगी बसने हरिहरेश्वरला जात असताना बस उलटली आहे. 

दरम्यान, पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाले होती. या बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते. पण ताम्हिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला अन् ही बस उलटली. यावेळी एकच गोंधळ पाहायला मिळाला.