Raj Thackeray Pune: पुण्यात बैठक सुरू होण्याआधीच राज ठाकरे संतापून निघून गेले, नेमकं घडलं काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पक्ष कार्यालयात आल्यानंतर अनेक पदाधिकारी उपस्थित नव्हते, बैठकीला सुरुवात होत नव्हती. त्यामुळे संतापलेले ठाकरे थेट पक्ष कार्यालयातून निघून गेल्याची घटना घडली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार ते आले होते. यामध्ये शाखा प्रमुखांपासून ते संघटकांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निरोप देण्यात आला होता. मात्र यावेळी अनेकजण उशिरा येत असल्याने बैठकीला उशीर झाला.

दरम्यान, राज ठाकरे हे दुपारी दोनच्या सुमारासच नवी पेठेतील पक्ष कार्यालयात पोहचले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी बैठकीपूर्वी पक्ष कार्यालयात पोहचले नाहीत. यामुळे अडीच वाजून गेले तरी बैठक सुरु झाली नाही.

यामुळे राज ठाकरे चांगलेच संतापले. काही वेळात संतापलेले राज ठाकरे यांनी ही बैठक वेळेत सुरु करायची नव्हती तर, मला इथे कशाला बोलावले? असे विचारत ते उठून निघून गेले. ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यामुळे यावेळी मोठा गोंधळ बघायला मिळाला.

दरम्यान, याबाबत पक्षाचे प्रवक्ते योगेश खैरे म्हणाले, बैठकीला उशीर झाला म्हणून राज ठाकरे नाराज होऊन निघून गेले नाहीत. त्यांनी काही संघटकांशी चर्चा सुरु केली होती, पण त्यांना जशी माहिती अपेक्षीत होती, तशी माहिती मिळाली नाही.

यामुळे त्यांनी तुम्ही आणखी तयारी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करा. त्यानंतर मी बैठक घेतो असे सांगितले त्यानंतर ते कार्यालयातून बाहेर पडले, असे सांगितले. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.