शरद पवारांना मोठा धक्का, सर्वाधिक विश्वासू नेता अजितदादा गटात सामील; नाव वाचून धक्का बसेल

अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. फुटीनंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत जाताना दिसले. शरद पवारांच्या जवळचे अनेक नेते अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सामील झाले आहे.

अशात शरद पवार यांच्याकडे असणारे आणखी काही आमदार अजित पवारांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शरद पवारांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू असलेल्या नेत्याचाही समावेश आहे.

अजित पवारांनी बंड केल्यानंतर दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांसारखे नेते अजित पवारांच्या गटात सामील झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. पण अजूनही सर्व घडामोडी संपलेल्या नसून अजूनही काही आमदार अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या गटातील तीन आमदार अजित पवार यांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहे. त्या तीन पैकी दोन आमदारांची नावे समोर आली आहे.

शिराळा मतदार संघाचे आमदार मानसिंग नाईक, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोन आमदार अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या आमदाराचे नाव अजूनही समजू शकलेले नाही.

शरद पवारांच्या गटातील या तिन्ही आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. ते लवकरच अजित पवारांच्या गटात सामील होणार आहे. पण अजून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. राजेश टोपे हे शरद पवारांचे खुप जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. पण आता तेही अजित पवारांच्या गटात जाणार असल्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.