‘शिकार करून खाणार राम मांसाहारी होता, तुम्ही आता…’; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे आता ते अडचणीत सापडले आहेत. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केल्यानंतर विरोधकांबरोबर स्वपक्षीयांकडूनही ते अडचणीत आले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आमदार रोहित पवार यांनी त्यांनी घरचा आहेर दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला. ठाण्यात याबाबत निदर्शने करण्यात आली आहे.  

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

तसेच रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले, यामुळे आता अजित पवार गट तसेच भाजप आक्रमक झाली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सभेत आव्हाड म्हनाले होते की, भाजप ओबीसींची बाजू आता घेते आणि पूर्वी मंडल विरुद्ध कमंडल हे कुणी केलं होतं तर ते भाजपने केलं होतं. बावनकुळे यांना प्रश्न आहे की ज्यावेळी मंडल विरूद्ध कमंडल यात्रा निघाली त्यावेळी तुम्ही कोणत्या चाकावर बसला होता? असेही आव्हाड म्हणाले.

तसेच ते म्हणाले, शाहू महाराजांची हत्या करण्याचा कुणी कट रचला होता? बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कूणी केला? शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दिले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.