वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पळाली, तीन मुली वाऱ्यावर, शेजाऱ्यांना समजलं अन्..

आपल्या पोटच्या लेकरांना प्रेमाखातीर सोडून देणारे निर्दयी आई वडील छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आले आहेत. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. लहान अशा तीन मुलींना घरात सोडून वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पळून गेले आहेत.

या घटनेला तीन महिले उलटले असून, दोघांपैकी एकही जण घरी न परतल्याने ही मुलं उघड्यावर आली आहेत. या घटनेनंतर शेजाऱ्यांकडून या मुलांचे पालनपोषण करण्यात आले, आता तिन महिन्यानंतर मात्र याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

संभाजीनगर शहरात एक जोडपे काही महिन्यांपासून किरायाने राहत होते. त्यांना तीन मुलं आहेत. असे असतानाच दोघांचे बाहेर वैयक्तिक विवाहबाह्य संबंध सुरू झाले. याबाबत या मुलींना काही कल्पना नव्हती. आपल्या मुलांकडे देखील त्यांचे लक्ष नव्हते.

आपल्या प्रेमात अडचण येत असल्याने अनेकदा ते मुलांना मारहाण करत असत. काही दिवसांनी दोघेही घर सोडून निघून गेले. आई प्रियकरासोबत निघून गेल्याने, वडील देखील प्रेयसीसोबत कुठेतरी निघून गेले. तीन महिन्यांनी देखील ते माघारी आले नाहीत.

यामुळे आई- वडिलांच्या प्रतीक्षेत मुलींच्या डोळ्यातील अश्रू क्षणभरही थांबले नाहीत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. या तिन्ही चिमुकल्यांनी घरात आपले पोटाची भूक भागविली. जेव्हा याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली तेव्हा ते देखील मुलांच्या मदतीला आले.

नंतर शेजारच्यांनी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. यावर सातारा पोलिसांनी खात्री करून हे प्रकरण बाल कल्याण समितीसमोर ठेवले. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या आई वडिलांचा तपास केला जात आहे.