नाशिक शहरातील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे ३६ वर्षीय विवाहित महिला आणि १५ वर्षीय मुलगा पळून गेल्याने समाजात खळबळ उडाली आहे. प्रेमामुळे सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्याने या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
महिला, महिलेचा पती, १५ वर्षीय मुलगा, आणि १० वर्षीय मुलीसह सिडको परिसरात राहत होती. परिचयातील १५ वर्षीय मुलासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे दोघेही पळून गेले. काही काळ मुंबईतील एका बांधकाम साइटवर राहिल्यानंतर पैसे संपल्याने आणि झालेली चूक लक्षात आल्याने ते नाशिकला परतले.
मधल्या काळात, दोन्ही कुटुंबांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मुलगा अल्पवयीन असल्याने, पोलिसांनी महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने समाजात कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सध्या, पोलिस पोस्को कायद्यानुसार पुढील कारवाईबाबत विचार करत आहेत. या घटनेने सिडको परिसरात खळबळ माजवली असून, नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी समाजात चांगले संस्कार आणि पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.