रत्नागिरीत राणेंना बसणार धक्का! राऊतांचे सगळे डाव यशस्वी, विजयही पक्का? जाणून घ्या….

राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी नुकतेच मतदान पार पडले, यामुळे कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण ६ जागा येतात.

याठिकाणी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत होत आहे. याठिकाणी विधानसभेच्या एकूण ६ जागा आहेत. पैकी ३ जागा रत्नागिरीत, तर ३ जागा सिंधुदुर्गात आहे. रत्नागिरीतील तिन्ही जागांवर ६० टक्क्यांच्या खाली मतदान झाल आहे.

तर राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात ६० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. यामुळे जोरदार लढत याठिकाणी होणार आहे. याठिकाणी शिवसेनेने आधी रत्नागिरी-सिंधुदुर्गवर सांगितलेला दावा, त्यांच्याकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या रुपात असलेला चेहरा, मात्र तरीही तिकीट मिळाले नाही.

त्यामुळे मतदानपत्रिकेतून गायब झालेला धनुष्यबाण, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भाजपनं दिलेली उमेदवारी, त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, यामुळे याठिकाणी मोठी चर्चा झाली. ठाकरे गटाचे आमदार असलेल्या वैभव नाईक यांच्या मतदारसंघात ही टक्केवारी ६० ते ६१% च्या दरम्यान राहिली आहे.

याठिकाणी विनायक राऊत यांना रोखण्याचा प्लॅन यशस्वी झाला नाही. यामुळे या मतदारसंघात राऊत व राणे यांच्या लढतीत धाकधूक वाढली आहे. नारायण राणे यांनी या लोकसभा मतदारसंघात आपले जुने स्नेही, मित्र या सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या मतदारसंघातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झालेला रिफायनरी प्रकल्प हा राजापूर विधानसभा मतदारसंघात आहे. हा विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या ताब्यात आहे. याठिकाणी राऊत यांना साथ मिळेल, असे सांगितले जात आहे.