rape :भाऊ नव्हे हैवाण! अश्लिल व्हिडीओ बनवून बहिणीवर करायचा बलात्कार, ‘असे’ उघडकीस आले सत्य

rape : मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बारामतीमध्ये तर बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

नेमकं काय घडलं?
पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी मावशीकडे राहण्यासाठी आली होती. या अल्पवयीन विद्यार्थिनीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ यूट्यूब व्हायरल करून तिला ब्लॅकमेल केले जात होते. इतकत नाही तर हे सगळ कृत्य करणार व्यक्ती अल्पवयीन मुलीचा सख्खा मावस भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील एका मुलीसोबत तिचा मावस भाऊ नेहमी वाईट वागणूक करत होता. तो तिला धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत मुलीने आपल्या मैत्रिणींना सांगितले. मैत्रिणींनी याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी मावस भावाने मुलीसोबतचे व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवले होते. त्याचा वापर करून तो तिला ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनी आरोपी मावस भावाला ट्रॅप लावण्याची योजना आखली. सामाजिक कार्यकर्त्या आणि मुलीच्या मैत्रिणींनी आरोपी मावस भावाला मुलगी भेटायला तयार असल्याचे सांगितले. त्यावर आरोपी मावस भावाने मुलीला शाहू हायस्कूल समोर भेटायला बोलावले.

पोलिसांनी शहर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मदतीने आरोपी मावस भावाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून व्हिडिओ आणि फोटो जप्त करण्यात आले. आरोपी मावस भावाला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला.

या प्रकरणात मुलीचे आईवडील गरीब असल्याचा फायदा घेत आरोपी मावस भावाने त्यांना तक्रार करू नये म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.