चेहरा काळा पडलेला, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा ‘तो’ शेवटचा भयानक फोटो आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ते फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते.

गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे येथे एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. अचानक त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना फ्लॅटमधून दुर्गंधी यायला लागली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली होती.

पोलिसांनी दरवाजा तोडून बघितलं तर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये होता. आता शवविच्छेदन झाले असून त्यांच्या कुटुंबाकडे त्यांचा मृतदेह सोपवण्यात येणार आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा पुण्यात आला होता.

रवींद्र महाजनी यांच्या शेटवच्या दिवसांमध्ये कोणीच त्यांच्यासोबत नव्हतं. त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वीच झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या शेवटच्या काळातील त्यांचा एक फोटो समोर आला आहे. त्यामध्ये त्यांचा मृतदेह हा जनिमीवर पडलेला आहे.

दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्यामुळे त्यांचा चेहरा काळा पडला होता. त्यांच्या बेडच्या बाजूला काही शुज दिसून होते. तसेच एक प्रोटिन पावडरचा डबाही तिथे होता. रवींद्र महाजनी हे बेडच्या खाली पडलेले होते.

शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची अवस्था खुपच भयानक झाल्याचे दिसून येते. १९७५ ते १९९० पर्यंत त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करत चित्रपट सुपरहिट बनवले होते. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी काही नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांचा चित्रपटात संधी मिळाली होती.