मराठी चित्रपटसृष्टीला हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. बंद घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. १९७५ ते १९९० च्या काळात त्यांनी संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती.
रवींद्र महाजनी यांचे वय ७७ वर्षे होते. त्यांच्या दमदार अभिनय आणि देखण्या रुपासाठी ओळखले जात होते. शुक्रवारी एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून याचा तपासही पोलिस करणार आहे.
अभिनेते गेल्या काही दिवसांपासून आंबी येथील एका फ्लॅटमध्ये राहत होते. पण शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून खुप दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले होते.
फ्लॅटचा दरवाजा हा आतुन बंद होता. त्यामुळे पोलिसांनी तो दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना घरामध्ये रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून पोलिस त्याचा तपास करत आहे.
पोलिसांनी याबाबत रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबाना माहिती दिली आहे. आता पोस्ट मार्टम केल्यानंतर त्यांचा अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांनी देवता, मुंबईचा फौजदार, झुंज या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले होते
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावला झाला होता. त्यांचे वडील ह. रा. महजनी हे जेष्ठ पत्रकार होते. रवी्ंद्र महाजनी यांचे बालपण मुंबईत गेले होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करत मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले होते.